Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर पॅरिस ऑलिंपिकच्या 8k थेट प्रक्षेपणाचे जनक रवी वेल्हाळ : डॉ. जे. जे....

पॅरिस ऑलिंपिकच्या 8k थेट प्रक्षेपणाचे जनक रवी वेल्हाळ : डॉ. जे. जे. मगदूम कॅालेज ॲाफ ईंजिनियरिंग चे माजी विद्यार्थी

161
0

जयसिंगपूर: प्रतिनिधी –

पॅरिस ऑलिंपिकमध्ये सांगलीच्या रवी वेल्हाळ यांच्या 8k च्या आधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती केली. त्यांच्या कर्तुत्वाबद्दल ईंटरनॅशनल ॲालिंपिक कमिटीचे ( IOC) प्रेसिडेंट थॉमस बाच यांनी कौतुक केले. रवी वेल्हाळ हे डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे माजी विद्यार्थी आहेत. वेल्हाळ यांच्या अलौकिक कार्याबद्दल ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी अभिनंदन केले.

४० ते ६० एमबीपीएस बँडविड्थ मध्ये आपण सर्व दृश्ये 8K मधे याद्वारे पाहू शकणार आहोत. ही टेक्नॉलॉजी ४ खंड व ९ देशांत रवि वेल्हाळ यांनी पोहचवली आहे. एका 8K फ्रेम मध्ये 33 मेगाफिक्सल डेटा कॅप्चर केला जातो. याचा फायदा ऍनालिसिस करण्यासाठी रेफ्रिना, खेळाडूंना, ॲथलेटिक्सना AI द्वारे सेल्फ एनालिसिस करण्यासाठी होणार आहे.

टोकियो ॲालिपिंक मध्ये रवि यांनी टिमन १०० एमबीपीएस बँडविथ मधे 8K लाईव्हस्ट्रिम केली होती. पॅरिस २०२४ मधे घरच्या ब्रॉडबँड कनेक्शन वरती ४० एमबीपीएस 8K स्ट्रिम मध्ये सर्व दृश्य आपण बघू शकणार आहोत हा या संशोधनाचा मोठा फायदा आहे.

आतापर्यंत हॉलिवुडमध्ये जवळपास 10 -12 चित्रपट व्हिज्युअल रियालिटी मध्ये बनवलेले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणापासून प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन वृत्ती रवी वेल्हाळ यांनी जोपासली. सध्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये ८ के च्या संशोधनाने माहितीच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रविना तीन एमीज नामांकन, डिजीटल एंटरटेनमेंट ग्रुपच्या लाईफटाईम अचिन्हमेंटस अवॉर्ड, DEG चे टेक्नोलॉजी अचिव्हमेंट अवॉर्डस, लुमिएर असे पुरस्कार मिळाले आहेत. रवी वेल्हाळ यांचा शैक्षणिक व संशोधनात्मक प्रवास हा डिप्लोमा ते डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूर, सांगली, हॅालिवूड, टोकियो व पॅरिस पर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या यशाचे अभिनंदन महाविद्यालयाकडून कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here