Home Trending Now बदलापूर येथील घटना अत्यंत निंदनीय असून, संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी –...

बदलापूर येथील घटना अत्यंत निंदनीय असून, संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी – डॉ.नीलम गोऱ्हे

146
0

बदलापूर

बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेला शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर तेथील शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत त्यांनी तात्काळ पोलीस उपायुक्त श्री.सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला आहे.

बदलापूर येथे अत्यंत लहान दोन मुलींच्या वरती त्या शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केले याबाबत सविस्तर बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहेत. आज शाळेत पालक शिकले व त्यांनी शाळेतील प्रशासनाला जाब विचारला. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती शितोळे यांची बदली केलेली आहे, तसेच या पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी पालकांना दम दिल्या बाबतही सदर बातमीमध्ये दिसते आहे. याची गंभीर दखल डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. पोलीस उपायुक्त श्री.सुधाकर पठारे यांना डॉ. गोऱ्हे यांनी खालील निर्देश दिलेले आहेत.

*शालेय प्रशासन व व्यवस्थापन*

१) शाळांमधील शिक्षक व पालक संघाच्या तात्काळ बैठका घ्याव्याव. यामध्ये व्यवस्थापन व शालेय प्रशासन यांना विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या
सुरक्षते बाबत सविस्तर आढावा घ्यावा व शाळा व्यवस्थापनाला कठोर सूचना द्याव्यात.
२) या शिक्षक पालक संघाच्या वारंवार बैठका पोलीस विभाग, शिक्षण विभाग,आरोग्य विभाग यांनी घ्यावी. व सुरक्षितता बाबत,आरोग्य बाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घ्यावा.
२) पोलीस स्टेशन निहाय महिला दक्षता समितीच्या बैठका घ्याव्यात. तसेच महिलांचे वरील व मुलींच्या सुरक्षतेबाबतच्या स्थितीचा आढावा वेळोवेळी घ्यावा.
३) सर्व शाळांनी मुलींच्या सुरक्षतेसाठी महिला कर्मचारी नेमावेत.
४) शाळेमध्ये सीसीटीव्ही लावावेत व त्याचे नियंत्रण मुख्याध्यापक यांचे कार्यालयात ठेवावे.

*पोलीस प्रशासन*

५) या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करावी. सदर व्यक्ती हा निष्णात असावा.
६) श्रीमती शितोळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचेवर चौकशी करून कडक कारवाई करावी.

६) तसेच पालकांना दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकारी यांची ही चौकशी करावी.

७) चौकशी अधिकारी म्हणून
सक्षम वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी नेमावी.

८) दोन्ही मुली व त्यांचे पालकांचे समुपदेशन करावे.
९) या प्रकरणात जामीन मिळू नये याबाबत पोलीसांनी आवश्यक काळजी घ्यावी.
१०) आरोपी यास कमीत कमी कालावधीमध्ये शिक्षा व्हावी. हा गुन्हा जलदगती न्यायालय कडे वर्ग करावा.
अशा प्रकारच्या सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनास दिल्या. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर अहवाल ही सदर करण्याच्या सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here