Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *”हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता माफ करणार नाही” — सतेज...

*”हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता माफ करणार नाही” — सतेज पाटील यांचा हल्लाबोल*

7
0

*”हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता माफ करणार नाही” — सतेज पाटील यांचा हल्लाबोल*

*कोल्हापूर (MyMedia24) -* गोकुळ दूध संघाच्या सत्तेवरून कोल्हापूरच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. महायुतीने सत्तेची दंडुकेशाही वापरून गोकुळवर मतदानाचा अधिकार असलेले 4 अशासकीय सदस्य नेमण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीचा खून असल्याची टीका आमदार *सतेज पाटील* यांनी केली आहे.

*सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?*
महायुतीने सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोकांच्या भावना खुंटीला टांगल्या आहेत. गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या वारसाला अध्यक्ष पदापासून रोखण्याची खेळी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा खेळली आहे. असे अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही.

*साडेपाच लाख दूध उत्पादकांचा कौल धुडकावला?*
गोकुळच्या निवडणुकीत साडेपाच लाख दूध उत्पादकांनी आमच्या समविचारी आघाडीला बहुमत दिले. नैसर्गिक न्यायाने आमचाच अध्यक्ष होणे क्रमप्राप्त होते. पण महायुतीने कुटील राजनीती वापरून — संचालकांनी अध्यक्ष निवड सभेला गैरहजर राहणे आणि नियमबाह्य पद्धतीने ४ अशासकीय सदस्य नेमणे — असे निर्णय घेतले. याचा अर्थ महायुतीला दूध उत्पादकांचा कौल आणि लोकशाही मान्य नाही, असा पत्रकात म्हटलं आहे.

*कोर्टाचा निर्णय काय?*
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सोमवार दि. २नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत — निवडून आलेल्या २५ संचालकांमधूनच चेअरमन निवड व्हावी — असा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा अवमान राज्य शासन करणार नाही, याची खात्री आहे, पण असा प्रयत्न झाल्यास कायदेशीर विरोध करू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.

*भविष्यात गावागावातही हेच होणार?*
आज गोकुळबाबत जो निर्णय घेतला आहे, तसाच निर्णय भविष्यात ग्रामपंचायत, दूध संस्था, विकास सेवा संस्था, पतसंस्था यांच्याबाबतही महायुती घेईल, हा धोका लोकांनी ओळखावा, असेही पाटील म्हणाले.

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here