Home मुंबई *MNS ला धक्का! प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश — भाजप,...

*MNS ला धक्का! प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश — भाजप, आप कार्यकर्तेही सोबत!*

8
0

*MNS ला धक्का! प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश — भाजप, आप कार्यकर्तेही सोबत!*

*मुंबई (MyMedia24) -* महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस *रणजित श्रीकांत शिरोळे* यांनी आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

*कोणाच्या उपस्थितीत प्रवेश?*
काँग्रेस प्रभारी *डॉ. सिरिवेल्ला प्रसाद* आणि प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद उपस्थित होते.

*कोण-कोण आले काँग्रेसमध्ये?*
– *रणजित शिरोळे* — MNS प्रदेश सरचिटणीस
– *यशवंत म्हात्रे* — उरण भाजप पदाधिकारी
– *थॉमस मॅथ्यू* — आम आदमी पार्टी
– *जयेश ठाकूर, कृष्णा श्रीवास्तव, सेधुरमण अय्यर* — सामाजिक कार्यकर्ते

*हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?*
देशातील वातावरण बदलले असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात आहे. काँग्रेसमध्ये प्रवेशाचा ओघ वाढत आहे. दिवाळीची सुरुवात पक्षप्रवेशाचे फटाके फोडून झाली आहे. आगामी काळात अनेक तरुण नेतृत्व काँग्रेसमध्ये येतील.

*रणजित शिरोळे काय म्हणाले?*
शिरोळे कुटुंबाचा काँग्रेस विचारांशी जुना ऋणानुबंध आहे, तोच वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसमध्ये आलोय. राहुल गांधी यांचे हात बळकट करणार आणि कार्यकर्ता म्हणून काँग्रेस विचार घराघरात पोहोचवणार.

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here