*महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेला १४४० डॉक्टरांचे बळ! एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप*
*मुंबई (MyMedia24) -* महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक दिवस! एकाच वेळी *१४४० नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी (गट-अ)* सेवेत दाखल झाले असून, त्यांना उपमुख्यमंत्री *एकनाथ शिंदे* यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले.
*शिंदे साहेब काय म्हणाले?*
डॉक्टर होणे ही केवळ पदवी आहे, पण डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई आहे. रुग्णाला औषधोपचाराबरोबर मानसिक आधार देऊन त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हे डॉक्टरांचे खरे यश आहे.
*ठळक मुद्दे —*
– या १४४०मध्ये सुमारे *७०० महिला डॉक्टर* आहेत
– ग्रामीण भागातील MBBS डॉक्टरांची कमतरता आता भरून निघणार
– ही भरती पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे झाली — कौतुकास्पद
– उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दरवर्षी पुरस्कार द्यावा, अशी सूचना
*डॉक्टरांसाठी सुविधा देणार —*
डॉक्टरांकडून उत्तम सेवा अपेक्षित असेल तर त्यांना दर्जेदार निवास, स्वच्छ परिसर, शुद्ध पाणी, मुबलक औषधे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर द्यावे लागेल. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था पाहून ३ महिन्यात व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते.
*आरोग्य क्षेत्रात काय केलं?*
– मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून *५६० कोटी* गरजू रुग्णांना दिले
– महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा ५ लाखावरून *२२लाखांपर्यंत* वाढवली
– १२.५० कोटी नागरिकांना विमा संरक्षण
– ३ कोटी महिलांची तपासणी, वाढदिवसानिमित्त ८ मॅमोग्राफी व्हॅन गावागावात पाठवल्या
*कोविडची आठवण —*
कोविड काळात डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून सेवा केली. स्वतः PPE किट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर दिला होता.
*कोण होते उपस्थित?*
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, खासदार संजय जाधव, आमदार प्रा. मनिषा कायंदे, आयुक्त संजय काटकर उपस्थित होते.
—
*
!*





















