Home मुंबई *अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानात काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटातून उलगडणार थरारक...

*अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानात काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटातून उलगडणार थरारक सत्य!*

7
0

*अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानात काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटातून उलगडणार थरारक सत्य!*

*मुंबई -* अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये एक अशी धक्कादायक घटना घडली, जिने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं! नेमकं काय घडलं होतं पाकिस्तानात? याच चित्तथरारक सत्य घटनेवर आधारित *’जय श्री राम’* हा भव्य मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच दणक्यात सुरुवात झाली असून वेगळ्या विषयाची लक्षवेधक मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्ये हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

*कोण करतंय निर्मिती?*
‘सेव्हन ओशन स्टुडिओज’ आणि ‘अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राम खाटमोडे आणि सागर पाठक दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत, तर विनोद वणवे सहाय्यक दिग्दर्शक आहेत.

*स्टारकास्ट दमदार!*
मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत आणि दमदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानात घडलेली ती अनपेक्षित घटना काय होती? त्याचे कोणते थरारक पैलू पडद्यावर उलगडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here