Home नाशिक *# राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन संपन्न*

*# राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन संपन्न*

5
0

*# राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन संपन्न*

*## गौतमी गंगा गोदावरीचे पूजन व आरती*

*नाशिक (त्र्यंबकेश्वर), दि. ३१ ऑक्टोबर:* त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ध्वजपूजन सोहळा धार्मिक आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौतमी गंगा गोदावरीचे विधिवत पूजन, सिंहस्थ ध्वजपूजन, विशेष अर्घ्य अर्पण आणि गोदावरी आरती करण्यात आली.

या सोहळ्याला राज्यपाल विष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि रोजगार हमी योजना व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रपती कुशावर्त येथे पोहोचल्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात राष्ट्रपतींच्या हस्ते पवित्र गौतमी गंगा गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सिंहस्थ ध्वजाचे पूजन आणि विशेष अर्घ्य अर्पण करून गोदावरीची आरती संपन्न झाली. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक अनुष्ठानांमुळे कुशावर्त तीर्थ परिसर भक्तिमय झाला होता.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. कुशावर्त तीर्थ हे गोदावरी नदीचे पवित्र उगमस्थान मानले जाते आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत या तीर्थाला अत्यंत विशिष्ट स्थान आहे.

या कार्यक्रमाला आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीज महाराज, विविध आखाड्यांचे साधू-संत व महंत, स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरोहित संघाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानपूर्वक ताम्रपत्र भेट देण्यात आले.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here