Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग शिरगाव येथे पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला यश!

शिरगाव येथे पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला यश!

5
0

शिरगाव येथे पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला यश!

सुचेता मोरे:
शिरगाव, ता.चिपळूण
विवेक शिंदे यांच्या पुढाकारातून नदीपात्रात कच्चा बंधारा; पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
शिरगाव (प्रतिनिधी) : शिरगाव येथील वरची वाडी सोनार बाव येथे श्री. विवेक मधुकरराव शिंदे यांच्या सौजन्याने नदीपात्रात पाणी साठवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने कच्चा बंधारा घालण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेत सहभागी होत राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील पाळीव प्राणी, पक्षी तसेच रानटी प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील चार ते पाच महिन्यांसाठी सुटण्यास मदत होणार आहे.
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि वन्यजीवांसह पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. नदीपात्रात पाणी अडविल्यामुळे पाण्याचा साठा निर्माण होऊन परिसरातील जीवसृष्टीला मोठा दिलासा मिळणार आहे.
या वेळी स्वतः विवेक मधुकरराव शिंदे, मनोजराव शिंदे, सुधाकरराव शिंदे, भाई शिंदे, प्रशांत शिंदे, सुनीलराव शिंदे, संतोष भालेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी विवेक शिंदे यांचे आभार मानत त्यांचे विशेष कौतुक केले. पाणी संवर्धनासोबतच पशुपक्ष्यांच्या जीवनालाट आधार देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here