मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजनांचा प्रसार करण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार
मुंबई,
मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजेनचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे,या योजेनेचा प्रसार व्हावा म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेसाठी ‘रथ ‘ तयार करण्यात आलेला आहे.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आणलेल्या योजनांचा प्रसार करणे आणि जनतेशी संवाद साधने हा या रथ निर्मितीचा उद्देश आहे.
यावेळी जिल्हा-तालुका, गाव पातळीवर आजच्या घडीला अनेक सरकारी योजना अशा आहेत, ज्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही. त्या योजनांची पूरक माहिती खेड्यापाड्यात, गावागावात जाऊन देणं हे शिवसेनेचं काम आहे.
हाच विचार डोक्यात घेऊन शिवसेना नेत्या व डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून माहितीचा रथ जनतेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणेकरून कोणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
आज दि.१३ ऑगस्ट रोजी या रथाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मुंबईतील मलबार हिल येथील वर्षा बंगला येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला.
प्रगतीपथावर वेगानं पुढे जाण्यासाठी शिवसेना महिलांना आकाश मोकळं करून देण्याचं काम करत आहे.चांगल्या दर्जाचं शिक्षण सर्व समाज घटकातील मुलींना मिळावं, तसेच महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांच्या लाभापासून कोणी वंचित राहणार नाही.हाच रथ निर्मितीचा उद्देश असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या या रथात टिव्ही स्क्रीन लावण्यात आलेली असून,माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचे व्हिडिओ बघण्याची तसेच ऑडियो ऐकण्याची सोय करण्यात आली आहे.



















