Home मुंबई तर अजित पवारांचाही पराभव झाला असता महेश तपासे

तर अजित पवारांचाही पराभव झाला असता महेश तपासे

129
0

मुंबई
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना खा. सुप्रियाताई सुळे यांच्या समोर उभा करणे चूक ही कबुली नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी दिली.

“खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात दस्तूर खुद्द श्री अजित पवार जरी उभे राहिले असते तरी त्यांचा पराभव नक्कीच झाला असता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

सत्ता येथे आणि सत्ता जाते परंतु सत्तेला परिवारापेक्षा जास्त महत्व दादांनी दिलं याचं दुःख वाटते. एकदा का परिवार तुटला की त्याला जोडणे कठीण होते आणि ही चूक दादांकडनं घडली. भाजप पेक्षा काका पवार साहेब कधीही श्रेष्ठच आहेत, जे पाहिजे ते दादांना आतापर्यंत दिलं तरी देखील अदृश्य शक्तीच्या नेत्याच्या नादाला लागून दादा हे काय कृत्य करून बसले, पक्ष फोडला, साहेबांना मानसिक वेदना दिल्या अशी खंत महेश तपासे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here