*हेडलाईन:* बेस्ट उपक्रमाच्या वेटलिज बसला अपघात; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, बेस्ट प्रशासनाकडून चौकशी समिती गठीत
*सब-हेडलाईन:* डोकीवड्या उड्डाणपुलाजवळ टेम्पोचा दरवाजा अचानक उघडल्याने अपघात, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
*दिनांक:* २२ ऑक्टोबर २०२६ | मुंबई
दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास बेस्ट उपक्रमातील वेटलिज तत्त्वावरील बसगाडीला भीषण अपघात झाला. मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदाराची बसगाडी क्रमांक ४४९ आणि PMJP वसाहत येथील बसगाडीचा डोकीवड्या उड्डाणपुलाजवळ अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, समोरून जाणाऱ्या एका टेम्पोचा मागील दरवाजा अचानक उघडल्याने हा अपघात घडला. या अपघातात टेम्पोमधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता, त्याचा नंतर मृत्यू झाला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाणे, अंधेरी (पूर्व) येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेची बेस्ट प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बेस्ट प्रशासनाने या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी तातडीने एक चौकशी समिती गठीत केली आहे. तसेच, मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना तातडीची मदत देण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.
*बेस्ट प्रशासनाचे प्रतिबंधात्मक उपाय:*
भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने चालक प्रशिक्षणावर विशेष भर दिला आहे.
१. दि. २१ सप्टेंबर २०२६ पासून Hino Motors कंपनीमार्फत चालकांना उजळणी प्रशिक्षण दिले जात असून, आतापर्यंत ७५३ चालकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
२. दिंडोशी येथील वाहतूक प्रशिक्षण केंद्रात ३ दिवसांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत असून, ५,३९४ चालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
३. Western India Automobile Association (WIAA) यांच्या सहकार्याने ५०० चालकांना अत्याधुनिक सिम्युलेटरवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात असल्याचे सांगण्यात आले.
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*
*वृत्त : जे सत्य सांगते; सद रक्षणाय, खल दमनाय.*
—





















