Home मुंबई *मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन..*

*मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन..*

22
0

*मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन..*

*बातमी:*
मुंबई, दि. २२ ऑक्टोबर.. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला आहे. लोकशाही बचाव, संविधान बचाव चा नारा देत मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. “SIR रद्द करा” आणि “ज्ञानेश कुमार राजीनामा द्या” या प्रमुख मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान, एक शिष्टमंडळ तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर करणार होते पण पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलीसांनी युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असली तरी हे आंदोलन सुरुच राहिल. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाचा आवाज कोणीही दडपू शकत नाही असा इशारा उत्तर पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अब्दुल समद यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here