Home मुंबई *क्लेशापासून महाराष्ट्राला सोडविण्यासाठी पीएचडीधारकांनी प्रयत्न करावेत ; अरविंद सावंत यांनी काढले बुद्धिवंतांबद्दल...

*क्लेशापासून महाराष्ट्राला सोडविण्यासाठी पीएचडीधारकांनी प्रयत्न करावेत ; अरविंद सावंत यांनी काढले बुद्धिवंतांबद्दल गौरवोद्गार

68
0

*क्लेशापासून महाराष्ट्राला सोडविण्यासाठी पीएचडीधारकांनी प्रयत्न करावेत ; अरविंद सावंत यांनी काढले बुद्धिवंतांबद्दल गौरवोद्गार मुंबई,
सध्या नवरात्रोत्सवाचे दिवस सुरु आहेत आणि अशा वेळी शिवसेनेवर पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्यांना शिवसेना अपंग सहाय्य सेनेने सन्मानित करुन त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. आणि नवरात्रोत्सवाच्या दिवसांत आपण देवीची आरती म्हणतांना क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा म्हणतो. याच पार्श्वभूमीवर मी म्हणेन की या पीएचडी धारकांनी या महाराष्ट्राला क्लेशापासून सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्यांबद्दल शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी गौरवोद्गार काढले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक सामना या संदर्भात डॉ. मनोहर जोशी, डॉ. सुकृत खांडेकर, प्रा डॉ सौ. सरिता विजय वाकोडे, डॉ. अनंत गुरव, डॉ. मनीष देशमुख, डॉ. नंदकिशोर जगदाळे यांचा तसेच जर्मनीत जाऊन दृष्टीपलिकडचे सौंदर्य शास्त्र या विषयावर पीएचडी मिळविणाऱ्या अंध भगिनी डॉ. पूर्वी जंगम यांचा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना अपंग सहाय्य सेनेने आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार केला. त्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी आजचा दिवस माझ्यासाठी अतीशय भाग्याचा असल्याचे नमूद केले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या बुद्धिवंतांचा गौरव करुन नव्या पिढीला हे भांडार उपलब्ध करुन द्यावे, हे जुने संदर्भ आज सर्वांना समजणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी मराठवाड्यातल कट्टर शिवसैनिक महेश भगवंत पटील यांनाही सन्मानित करण्यात आले. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सर्व पीएचडी धारकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत ज्ञानदेव लाडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, ज्येष्ठ पत्रकार नीलिमा कदम जांगडा यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले तर कवी विजय तारी यांनी आभारप्रदर्शन केले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here