Home महाराष्ट्र वाचन प्रेरणा दिनानिमित्त वर्षभर वाचनाचा संकल्प करूया !-ना.उदय सामंत

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वर्षभर वाचनाचा संकल्प करूया !-ना.उदय सामंत

40
0

*वाचन प्रेरणादिनानिमित्त वर्षभर वाचनाचा संकल्प करूया !*-ना.उदय सामंत

वाचनातून विचार समृद्ध होतात, ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात आणि व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन हा केवळ एका दिवसाचा उपक्रम न राहता, आपल्या जीवनात वाचनाची सवय रुजविण्याची प्रेरणा ठरावा.

मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने पुढील वाचन प्रेरणा दिनापर्यंत किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आज मंत्रालयात आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिची समृद्ध साहित्यपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि भाषेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. मराठी भाषेचा अभिमान केवळ शब्दांतून नव्हे, तर दैनंदिन व्यवहारात मराठीतून संवाद साधूनही व्यक्त झाला पाहिजे.

चला, पुस्तकांशी मैत्री करूया, वाचनाची संस्कृती जोपासूया आणि ज्ञानसमृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान देऊया!

*सोशल लिंक्स:*

Facebook : https://www.facebook.com/share/p/19cuWegq5C/
Instagram : https://www.instagram.com/p/DehHRvyjtad/
X : https://x.com/samant_uday/status/2110728301337879006?s=20
Youtube : https://www.youtube.com/post/Ugkx-s6B7JUXGfCmCbvGBNs90i5Gn-7i7AdH

*- संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर, MAI MEDIA 24*

#VachanPrernaDin #UdaySamant #APJAbdulKalam #MarathiBhasha #MaiMedia24

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here