Home मुंबई मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभागात ग्रंथालयातच वाचनप्रेरणा...

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभागात ग्रंथालयातच वाचनप्रेरणा दिन संपन्न!

132
0

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभागात ग्रंथालयातच
वाचनप्रेरणा दिन संपन्न

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभागात ग्रंथालयातच वाजता वाचनप्रेरणा दिन
२०२६(१५ ऑक्टोबर ) रोजी ग्रंथालयातच जोशात साजरा झाला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यवाह भाग्यश्री नुलकर व डॉ .भारती निरगुडकर यांनी डॉ . अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
या वेळेला वाचनप्रेरणादिनानिमित्त वेगळा विषय घेतला होता . दिलेल्या चित्रापैकी (१–स्फूर्ती २-आजी व नात नात्याची नवी पालवी ) एक चित्र निवडून त्यावर स्वरचित कविता किंवा लेख याचे गीता गोखले , मधुरा महंत , सुप्रिया मोरे ,वर्षा जोग ,दिनानाथ भिडे सविता दांडेकर या ग्रंथालय सभासदांनी सादरीकरण केले .तसेच डॉ .अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा रजनी साळुंखे यांनी दिला. राईलकर यांनी एका पुस्तकाचा परिचय करून दिला ‘आदर्श वाचक ‘म्हणून रजनी सुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुभाषचंद्र खरे यांचा ८१व्या वर्षी M.A.झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हेमांगी गायकवाड यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यात महेश कवठकर ,युगंधरा वळसंगकर ,अवंती महाजन ,ग्रंथ सेवक व सेविकांचे सहकार्य लाभले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here