*”गतीमान सरकारचे गतीमान ढोंग! वावरात पाणी नाही अनं सत्तेच्या मळ्यात मात्र पैशाचा पाऊस!”*
*— राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा सरकारवर घणाघाती प्रहार!*
मुंबई:दिनांक: १३ ऑक्टोबर २०२६संपूर्ण महाराष्ट्रात आज दुष्काळाची भीषण सावली पसरली असून पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई निर्माण झाली आहे. वावरात पिके करपून गेलीत, विहिरी आणि बोअरवेल कोरडेठाक पडलेत आणि माणसांसोबत जनावरांच्या घशालाही कोरड पडली आहे. परंतु, गिधाडासारखे सत्तेवर बसलेले ‘थोर’ राज्यकर्ते मात्र भपकेबाज जाहिराती आणि इव्हेंटबाजीत मस्त आहेत, असा तडाखेबंद आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.
या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना ॲड. अमोल मातेले यांनी ”अहो सरकार, जरा वावराच्या बांधावर येऊन बघा! तुमच्या गतीमान कारभाराने महाराष्ट्राच्या घशाची पार थुंकी वाळवलीय!”
”ह्यो दुष्काळ काय आभाळातून अचानक टपकला नाय! ६ महिने झाले बाोंब मारतोय की पाणी टंचाई भेडसावतेय, टँकर लावा, जनावरांना छावण्या उभा करा. पण आमचे ‘भावी’ आणि ‘आजी’ नेते गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त खुर्चीचे संगीत रुरुक उडवण्यात गुंग आहेत!
अरे, माणसाला प्यायला थेंबभर पाणी मिळेना अन् हे म्हणे ‘महाराष्ट्र नंबर वन’ चाललाय! कसला नंबर वन? टँकरच्या रांगेत नंबर लावायला नंबर वन बनवलाय का?
गावात पाण्याचा टँकर आला की बाया-बापड्यांना हंड्यासाठी कुस्त्या खेळाव्या लागत्यात. पण आपल्या मंत्र्यांच्या बंगल्यावर मात्र कारंजं थुईथुई नाचत असतंय! जनतेच्या डोळ्यातलं पाणी पुसायची धमक उरली नाही, आणि कागदावर मात्र पाण्याचे मोठे मोठे प्रकल्प चालू आहेत!
जरा लाज-लज्जा उरली असल तर जाहिरातीच्या फ्लेक्सवर खर्च करणारे कोट्यवधी रुपये उचला अन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अन् जनतेच्या दावणीला पाण्याचे टँकर आणून उभे करा! नसेल जमत तर खुर्च्या खाली करा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही!”
टँकरची तात्काळ सोय प्रत्येक टंचाईग्रस्त गावात आणि वाडी-वस्तीवर सरकारी खर्चाने मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करा.चारा छावण्या: जनावरांच्या छावण्या आणि चारा डेपो तात्काळ सुरू करून पशुपालकांना दिलासा द्यावा.
वीज अन् रोहयो कामे शेतीची वीज बिलं माफ करून रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे तातडीने सुरू करा.जर सरकारने येत्या आठवड्यात दुष्काळ निवारणासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांना पाणी टंचाईचा जाब विचारेल, असा इशारा ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
























