Home Trending Now नृत्यनिपुण अभिनेत्री मधू कांबीकर – लावणीच्या घुंगरापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा थक्क करणारा प्रवास:प्रो....

नृत्यनिपुण अभिनेत्री मधू कांबीकर – लावणीच्या घुंगरापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा थक्क करणारा प्रवास:प्रो. शीतल हरीश करदेकर

63
0

*नृत्यनिपुण अभिनेत्री मधू कांबीकर – लावणीच्या घुंगरापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा थक्क करणारा प्रवास*

*पुणे, १२ ऑक्टोबर २०२६ -* मराठी चित्रपटसृष्टी, व्यावसायिक रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल लोककला – या तिन्ही क्षेत्रांवर तब्बल पाच दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या नृत्यनिपुण अभिनेत्री *मधू कांबीकर (७३)* यांची आज पुण्यात प्राणज्योत मालवली.

*बीडच्या माळेगावपासून मुंबईच्या रुपेरी पडद्यापर्यंत -* २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे कोल्हाटी समाजात जन्म. प्रसिद्ध साहित्यिक कै. किशोर शांताबाई काळे यांच्या सख्ख्या मावशी. वयाच्या ११ व्या वर्षी बाळासाहेब गोखले यांच्याकडून कथ्थक, पुढे लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, पांडुरंग घोटीकर यांच्याकडून लावणी. ‘सखी माझी लावणी’ द्वारे लोककला अमेरिका, दुबई, मॉरिशसपर्यंत.

*रंगभूमी -* लोकनाट्य: गाढवाचं लग्न, विच्छा माझी पुरी करा, मुजरा घ्या सरकार, उदे ग आंबे उदे. व्यावसायिक: वस्त्रहरण, तुमचा आमचा सेम असतं, अजब न्याय वर्तुळाचा (श्रीराम लागू, भक्ती बर्वे), पेइंग गेस्ट (विक्रम गोखले, राम मुंगी), काशि मी राहू, पुत्र कामेष्टी.

*रुपेरी पडदा -* ‘शापित’ (१९८२) मधील ‘बिजली’ – महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट + फिल्मफेअर + राष्ट्रीय पुरस्कार.

– *लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका आणि ‘एक होता विदूषक’ मधील त्यांचे अचूक कॉमिक टाइमिंग प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले.*

– *इतर गाजलेले चित्रपट: बिन कामाचा नवरा, सतीची पुण्याई, चल रे लक्ष्या मुंबईला, कुंकू, राजा पंढरीचा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, राघुमैना, डेबू, येऊ का घरात.*

*त्यांना त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ६ वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच २०१८ मध्ये ‘झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार’, ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’ आणि ‘केशवराव दाते पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.*

*२०१६ चा काळा दिवस आणि अखेरचा प्रवास*

*२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (माटुंगा) येथे एका संगीत कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण पाहत असतानाच त्यांना ‘हेमोरेजिक स्ट्रोक’चा तीव्र झटका आला. यामुळे त्यांच्या शरीराच्या एका बाजूला पॅरालिसिस (अर्धांगवायू) झाला. तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. प्रदीर्घ १० वर्षांच्या या वेदनादायी आजाराशी झुंज देत अखेर आज १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवली.*

*खऱ्या अर्थाने ‘नृत्यनिपुण’*

*मधू कांबीकर केवळ एक अभिनेत्री नव्हत्या, तर अभिनय, शास्त्रीय नृत्य आणि लोककला या तिन्हीवर हुकूमत गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील दुर्मिळ अष्टपैलू अवलिया होत्या. अत्यंत गरिबीतून शून्यातून विश्व निर्माण करत, समाजाचे टोमणे पचवून थेट राष्ट्रीय सन्मानापर्यंत पोहोचलेला त्यांचा हा जीवनप्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.*

*ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती. 🙏*

*”मधू कांबीकर या अत्यंत नम्र आणि पाय जमिनीवर असणाऱ्या कलाकार होत्या! दुर्दैवाने त्यांना पॅरॅलिसिस झाला नसता, तर त्यांनी मराठी रंगभूमीला अजून बऱ्याच उत्तम कलाकृती दिल्या असत्या!”*
*– ज्येष्ठ नाट्य निर्माते उदय धुरत (माऊली प्रॉडक्शन)*

*उदय धुरत यांच्या माऊली प्रॉडक्शनचे गाजलेले प्रयोग:*
*• 🎭 ‘पेइंग गेस्ट’ (विनोदी नाटक): ३५० प्रयोग*
*• 🎭 ‘आकाश पेलताना’: १०० प्रयोग*
*• 🎭 अनिल बर्वे लिखित दमदार नाटक आकाश पेलताना: डॉ. श्रीराम लागू मुख्य भूमिकेत , मधू कांबीकरने डाॅ लागूंसमोर समजून काम केलं तेही प्रभावी.(फक्त शनिवार-रविवार प्रयोग! डॉ. लागूंची १०० प्रयोगांची अट प्रॉडक्शनने यशस्वीरित्या पूर्ण केली होती!)*

*लावणी सम्राज्ञीची नम्रता आणि माऊली प्रॉडक्शनची नाळ – हा खरोखरच मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता!*

*- संपादक: प्रो. शीतल हरीश रामचंद्र (बुवा) करदेकर | MAI MEDIA 24*
*वृत्त : जे सत्य सांगते; सद् रक्षणाय, खल दमनाय.*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here