ज्येष्ठ संशोधक पं. सेतुमाधवराव पगडी पुरस्कार सतीश लळीत
यांना जाहीर
कोकणच्या कातळशिल्पांचे संशोधक
कोकणातील कातळशिल्प ही हजारो वर्षांची परंपरा आहे. हत्ती, मासे, पक्षी, मानव आकृती आणि गूढ नक्षी कातळात कोरलेली आहेत. हा एक मोठा सांस्कृतिक इतिहास आहे.
याच अनोख्या कलाकृतीवर गेली *२६ वर्षे* संशोधन करून ती जगासमोर आणली ती *सतीश लळीत* यांनी.
त्यांच्या याच कार्याची दखल म्हणून –
> *’अखिल महाराष्ट्राचा इतिहास परिषदे’तर्फे २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘ज्येष्ठ संशोधक पं. सेतुमाधवराव पगडी पुरस्कार’* त्यांना जाहीर झाला आहे.
ही घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रा. नामदेव गरड आणि सचिव डॉ. सोपान जावळे यांनी केली.
*पुरस्काराबद्दल :*
– हा पुरस्कार थोर इतिहास संशोधक पं. सेतुमाधवराव पगडी (१९१०-१९९४) यांच्या नावाने दिला जातो.
– शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि ७ हजार रुपये असे स्वरूप आहे.
– *८ जानेवारी २०२७* रोजी कर्जत (अहिल्यानगर) येथे होणाऱ्या ३४ व्या अधिवेशनात हा दिला जाईल.
*सतीश लळीत यांचे कार्य :*
– महाराष्ट्र शासनातून निवृत्त अधिकारी
– *६ मे २००१* रोजी सिंधुदुर्गातील जनत हिवाळे (ता. मालवण) येथे पहिल्या कातळशिल्पाचा शोध
– नंतर कुडोपी, खोटलेगरणे, धामापूरसह अनेक ठिकाणे शोधली
– *कुडोपी* या ठिकाणाचा समावेश तर *युनेस्कोच्या* जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत झाला आहे
– त्यांनी शोधलेले मातृदेवतेचे आणि मोगरणे धामापूर येथील ‘शिकारीशिल्प’ हे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर एकमेव आहे
हे आपल्या कोकणासाठी, महाराष्ट्रासाठी खूप मोठा अभिमान आहे!
हजारो वर्षांचा इतिहास एका माणसाने २६ वर्षे झिजून जगासमोर आणला!
अभिनंदन मा. लळीत सर!





















