अभिनयसम्राट मोहन जोशी यांचा सन्मान !
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या कसदार अभिनयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ माझ्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा गौरव करणारा हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे.
कोल्हापूरच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करताना मनस्वी आनंद झाला.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या त्यांच्या कलाप्रवासाला मनःपूर्वक सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
Shivsena – शिवसेना
#udaysamant #udaysamantsaheb #मोहनजोशी #अभिनयसम्राट #संगीतसूर्यकेशवरावभोसलेस्मृतीपुरस्कार #केशवरावभोसले #मराठीरंगभूमी #मराठीचित्रपटसृष्टी #मराठीनाट्य #रंगभूमी #मराठीकलाविश्व #अखिलभारतीयमराठीनाट्यपरिषद #कोल्हापूर #कलाकारसन्मान #मराठीकला #नाट्यपरंपरा #MohanJoshi #MarathiTheatre #MarathiCinema #MarathiCulture #Kolhapur #TheatreLegend #MarathiActor





















