*१० ते १२ वर्षांत काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे सोबत कोणताही संबंध नाही – स्वीडनच्या खासदार नीला विखे पाटील यांचा मोठा खुलासा*
*बातमी:*
*१० ते १२ वर्षात माझा काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे सोबत कोणताही दूरपर्यंत संबंध नाही – नीला विखे पाटील*
स्वीडन देशात खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी विखे कुटुंबाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या, “मी स्वीडन देशात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील १० ते १२ वर्षात माझा काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे सोबत कोणताही दूरपर्यंत संबंध नाही. आमचे कधीही कोणतेही संभाषण किंवा कौटुंबिक संबंध राहिलेले नाहीत. त्यांचे आणि माझे राजकारण तसेच विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. त्यांनी वारंवार आपले पक्ष बदलले आहेत, पण मी माझ्याच पक्षाशी बांधील आहे. त्यांनी माझे फोनवरून अभिनंदन केले असले, तरी त्यापलीकडे आमचे कोणतेही संबंध नाहीत.”
या वक्तव्यामुळे विखे पाटील कुटुंबातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
*
























