Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर कोल्हापूर आग दुर्घटनेची चौकशी करावी-विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

कोल्हापूर आग दुर्घटनेची चौकशी करावी-विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

148
0

कोल्हापूर दि.९

ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘केशवराव भोसले नाट्यगृहाला काल भयंकर आग लागली. यात वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूला आगीची झळ पोहचली असल्याने या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे,आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, ऐतिहासिक परंपरा लाभलेलं ‘केशवराव भोसले नाट्यगृहाला काल भयंकर आग लागली. कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा आहे, हा वारसा असा राख होताना बघणे हे भावनेला धक्का लागणारे आहे. या आगीत नाट्यगृहाचे, मौल्यवान गोष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढले पाहिजे, कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here