Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव *मंगळवारी वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी -*

*मंगळवारी वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी -*

48
0

*मंगळवारी वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी -*

*कधी आहे:*
– उद्या, मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ – या सालची तिसरी आणि शेवटची अंगारकी
– चतुर्थी तिथी: मंगळवार संध्याकाळी ५:०९ पासून सुरू, बुधवार ३० सप्टेंबर दुपारी २:५५ पर्यंत
– चंद्रोदय: रात्री ८:२९ वाजता – ८:२९ ते ९:०५ पर्यंत अर्घ्यचा शुभ मुहूर्त

*यावेळी विशेष संयोग:*
विघ्नराज संकष्टीवर मंगळवार, पितृपक्ष, शिव वास योग, हर्षण योग आणि भरणी नक्षत्र – असा दुर्लभ संयोग आहे. पितृपक्षात येत असल्याने पितृ तर्पण आणि गणपती पूजेचं एकत्र पुण्य मिळेल असं ज्योतिर्विद सांगतायत.

*मंदिरांची तयारी:*
– *प्रभादेवी आणि टिटवाला सिद्धिविनायक मंदिर:* उद्या गर्दीचा अंदाज असल्याने विशेष व्यवस्था
– *प्रभादेवी:* मध्यरात्री १:३० पासून दर्शन सुरू, २९ तारखेला रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर उघडं
– दादर स्टेशन ते मंदिर मोफत AC बस सेवा
– टिटवाला मंदिर पण रात्री ११:३० पर्यंत उघडं राहणार
– दोन्ही ठिकाणी अतिरिक्त पोलीस आणि खाजगी सुरक्षा तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here