*पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र*
*उद्घाटन:*
– *कधी:* उद्या, २९ सप्टेंबर, सकाळी ११ वाजता
– *कुठे:* SNDT महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई
– *हस्ते:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– *संकल्पना:* मंत्री मंगलप्रभात लोढा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार आणि इतर मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*या महाकुंभात काय होणार:*
– *४१८+ रोजगार मेळावे:* कोकण विभाग (मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) + नाशिक विभाग (नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार)
– *२५,०००+ नोकऱ्यांच्या संधी*
– *१५००+ नामांकित कंपन्या आणि ३०००+ उद्योग सहभागी*
– उमेदवारांना मुलाखतीसाठी सॉफ्ट स्किल्स, संभाषण कौशल्याचे ट्रेनिंग पण दिलंय
– QR कोड ने नोंदणी करता येईल
*विशेष:* SNDT मध्ये *लाडक्या बहिणींसाठी* वेगळा रोजगार मेळावा – ६००-७०० महिला सहभागी होणार.
तुम्हाला किंवा घरात कुणाला नोंदणी करायची असेल तर जवळच्या ITI किंवा जिल्हा कौशल्य विकास केंद्रात संपर्क करा म्हणतायत.





















