*हेडलाईन:* महायुतीला घटक पक्षाचा इशारा – महामंडळ द्या, नाहीतर ४८ जागांवर बासरी वाजवणार; राष्ट्रीय स्वराज्य सेनेची जोतिबावर पत्रकार परिषद
*कोल्हापूर / जोतिबा डोंगर :-* भाजपा-शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाने आज जोतिबा डोंगरावर पत्रकार परिषद घेऊन महायुतीला थेट इशारा दिला आहे.
२०२९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. श्रीहरी बागल हे संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्हा दौरा करत आहेत. मराठवाडा दौरा पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सांगता कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पोपट फुकटे यांच्या मागणीनुसार जोतिबा डोंगरावर कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषदेने करण्यात आली.
यावेळी बोलताना बागल यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांनी महामंडळावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे डोळेझाक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
*प्रमुख मागण्या:*
राष्ट्रीय स्वराज्य सेनेला १ महामंडळ अध्यक्षपद आणि ४ संचालक पदे द्यावीत.
– पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
– कृष्णा खोरे विकास महामंडळ
– एसटी महामंडळ
– लघु उद्योग समिती
२०१४ पूर्वीपासून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत. स्वखर्चाने महायुतीचे उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महामंडळावर आमचा हक्क आहे, असे बागल म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण आणि प्रसाद लाड यांनी तातडीने दखल घ्यावी, अन्यथा कार्यकर्त्यांची नाराजी वाढेल.
*थेट इशारा -*
मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय स्वराज्य सेना *बासरी 🪈* या चिन्हावर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात स्वबळावर उमेदवार उभे करेल आणि महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो.
या पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बने, पन्हाळा तालुकाध्यक्ष आनंद लादे, उपाध्यक्ष मारुती सातार्डेकर, सातारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, महिला अध्यक्ष सौ. गुजर मॅडम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*- अॅड. श्रीहरी बागल, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना (निवडणूक चिन्ह – बासरी)*
—






















