Home उद्योग / शिक्षण वार्ता बोगस शालार्थ घोटाळ्यात २४ तासात दोन कोर्टांचे दणके* * *मुख्य आरोपी...

बोगस शालार्थ घोटाळ्यात २४ तासात दोन कोर्टांचे दणके* * *मुख्य आरोपी अन्सारीला सुप्रीम कोर्टातही दिलासा नाही – अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली, आता अटकेपासून सुटका नाही* ** *मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाचा पोलिसांना दणका – तपासाच्या दिरंगाईवरून IG ला कोर्टात हजर राहण्याचे

143
0

*बोगस शालार्थ घोटाळ्यात २४ तासात दोन कोर्टांचे दणके*

*
*मुख्य आरोपी अन्सारीला सुप्रीम कोर्टातही दिलासा नाही – अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली, आता अटकेपासून सुटका नाही*
*मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाचा पोलिसांना दणका – तपासाच्या दिरंगाईवरून IG ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, तर शिक्षण आयुक्तांची VC वर कबुली – “घोटाळ्यात आमचेच अधिकारी सामील”*

*छत्रपती संभाजीनगर:* बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात 24 तासात दोन कोर्टांचे मोठे दणके बसले आहेत. एका बाजूला सुप्रीम कोर्टाने मुख्य आरोपीला दणका दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने पोलीस आणि शिक्षण विभागाला चांगलेच खडसावले आहे.

*१ सुप्रीम कोर्टाचा दणका – मुख्य आरोपीला जामीन नाही:*
मुख्य आरोपी *अन्सारी अब्दुल रहीम अब्दुल खलीक* याने अटकपूर्व जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती (SLP Crl. No. 18208/2026). मुंबई हायकोर्टाने (ABA No. 2434/2025) त्याचा जामीन 29 ऑगस्ट रोजी फेटाळला होता. त्याविरोधात तो सुप्रीम कोर्टात गेला होता. मात्र *23 सप्टेंबर 2026 रोजी सुप्रीम कोर्टानेही त्याची याचिका फेटाळली.* त्यामुळे आता त्याच्या अटकेतील अडथळा दूर झाला आहे.

*२. हायकोर्टात IG ला हजर राहण्याचे आदेश:*
या घोटाळ्याच्या तपासात होणाऱ्या दिरंगाईवरून हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तपासाचा आढावा घेण्यासाठी *IG दर्जाच्या अधिकाऱ्याने स्वतः पुढील सुनावणीला न्यायालयात हजर रहावे,* असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

*३. शिक्षण आयुक्तांची VC वर खळबळजनक कबुली:*
या सुनावणी दरम्यान शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. न्यायालयाने खडसावल्यानंतर शिक्षण आयुक्तांनी खळबळजनक कबुली दिली. *”बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात केवळ शिक्षण संस्था नाहीत तर काही शिक्षण अधिकारी देखील सहभागी आहेत,”* अशी कबुली त्यांनी दिली. तसेच भविष्यात शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here