Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा श्री सिद्धिविनायक मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाला निरोप 

श्री सिद्धिविनायक मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाला निरोप 

46
0

श्री सिद्धिविनायक मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाला निरोप

प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात विराजमान झालेल्या पार्थिव गणपती बाप्पाची रविवारी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या मंगलमय निनादात निघालेल्या या मिरवणुकीनंतर भक्तिमय वातावरणात बाप्पाचे विधीवत विसर्जन करण्यात आले.

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद सरवणकर, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, विश्वस्त राहुल लोंढे, महेश मुदलियार, सुदर्शन सांगळे, मनिषा तुपे, राखी चव्हाण आणि कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

*गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here