*महसुलमंत्र्यांचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान*
मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून पुणे येथे सुरू झालेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयाची दखल केंद्र सरकारने घेतली असून आता हा पॅटर्न देशभर राबवण्याचे निर्देश केंद्रीय भूमी संसाधन विभागाने दिले आहेत.
केंद्रीय सचिव नरेंद्र भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ‘केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६’ संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची VC बैठक झाली. यावेळी प्रत्येक आदर्श कार्यालयासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे सचिवांनी सांगितले.
या बैठकीत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या ‘एक जिल्हा, एक नोंदणी’, ‘ई-प्रमाण’, पासपोर्टच्या धर्तीवर ‘आदर्श कार्यालये’ आणि ‘ई-नोंदणी’ या उपक्रमांचे केंद्रीय सचिवांनी विशेष कौतुक केले.
*मंत्री बावनकुळे म्हणाले:* “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला गती देत, नागरिकांच्या सोयीसाठी भविष्यातही अधिक लोकाभिमुख सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पुणे येथे सुरू झालेल्या मॉडेल कार्यालयाची दखल केंद्राने घेतली.”
*आदर्श कार्यालयाची वैशिष्ट्ये:* स्लॉट बुकिंगद्वारे जलद नोंदणी, हाय-स्पीड स्कॅनिंग, बायोमॅट्रिक पडताळणी, एकाच दिवसात पावती, हेल्पडेस्क, AC प्रतीक्षालय, मोफत वाय-फाय.
—






















