*६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न*
*मुंबई -* महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा *६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा* बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील *रवींद्र नाट्य मंदिर* येथे आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने हा सोहळा संपन्न झाला.
यंदाचे मानकरी:
*चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार:*
– *जीवनगौरव -* पं. हृदयनाथ मंगेशकर
– *विशेष योगदान -* प्रसाद ओक
*राज कपूर पुरस्कार:*
– *जीवनगौरव -* ज्येष्ठ लेखक सलीम खान
– *विशेष योगदान -* अभिनेत्री राणी मुखर्जी
मान्यवरांची उपस्थिती:
राज्याचे *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार विशेष उपस्थित होते.
—
*






















