Home मुंबई *आष्टी विधानसभा मतदार संघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा* *मत्स्यव्यवसाय...

*आष्टी विधानसभा मतदार संघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा* *मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे*

27
0

*आष्टी विधानसभा मतदार संघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा*

*मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे*

मुंबई, दि. ७ : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर आधुनिक फिश मार्केट उभारणीस गती द्यावी. या बाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही गतीने करावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदार संघात नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर आधुनिक फिश मार्केट उभारणीस मंजुरी व निधी उपलब्ध करून देणे संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार सुरेश धस यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी बीड व बीड जिल्ह्यातील स्थानिक स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन नगरपंचायत व सहा ग्रामपंचायतसाठी फिश मार्केट उभारणीचे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले असता मंत्री नितेश राणे म्हणाले, या फिश मार्केट उभारणी प्रस्ताव आराखड्याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी. प्रस्तावांची तपासणी करून फिश मार्केट उभारणी संदर्भातील आवश्यक कार्यवाही कालबद्धरीत्या पूर्ण करावी.

मंत्री नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जास्तीत जास्त लाभ स्थानिक नागरिकांना मिळेल, याची दक्षता घ्यावी. स्थानिक पातळीवर मत्स्य उत्पादन वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, तसेच फिश मार्केटची वास्तुरचना (आर्किटेक्चर) आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असावी, असेही ते म्हणाले.

या फिश मार्केट मध्ये दर्जेदार व दीर्घकालीन सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे. फिश मार्केट उभारणी करताना नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here