नव्या ऊर्जेची आणि संकल्पाची सुरुवात!
काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज नाशिक इथे झाला.त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी राहुलजी गांधी यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत आगामी काळातील संघटन मजबुतीवर व राज्यातील राजकीय-सामाजिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सत्ता मिळवणे हे एकच पक्षाचे ध्येय नसून, जनतेला न्याय मिळवून देणे, संविधानाचे रक्षण करणे आणि लोकशाही बळकट करणे महत्वाचे आहे.
राहुलजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसचा कार्यकर्ता आता नव्या जोमाने जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरण्यास सज्ज आहे!
*खासदार वर्षा एकनाथ गायकवाड,*
*अध्यक्षा, मुंबई काँग्रेस.*






















