Home मुंबई *राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित; ३३८ जण संपर्कात*

*राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित; ३३८ जण संपर्कात*

35
0

*राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित; ३३८ जण संपर्कात*

*प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश*

मुंबई, दि. २९: नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

*मुख्य अपडेट:*

– *सागा येथून ४१ जण आज परतले*, १०६ जण नागपूरला उद्या पहाटे ४.३०वाजता पोहोचतील
– एकूण *१४३ नागरिक सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर*
– *मंत्रालय नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत* – हेल्पलाइन नंबर जारी
– *४५पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश* – संगमनेर ट्रॅव्हल्स (नाशिक, पुणे, मुंबई, अहिल्यानगर) – चितवन येथे होते, आता लुंबिनी मार्गे अयोध्या
– *४०४ सुरक्षित, ३३८ संपर्कात* – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व परराष्ट्र मंत्रालय समन्वय
– *१४९ भारतीय पर्यटक* चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षित – यादी राज्यांना पाठवली
– BMC EOC ला मुंबई बाबत अद्याप कोणताही कॉल नाही
– *बोरीवली-अंधेरी येथील ८ पर्यटक* – लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू, नातेवाईकांच्या संपर्कात प्रशासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर बसेस व प्रवास व्यवस्था करून बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने प्रवास सुरू.

*स्रोत: Team DGIPR / महाराष्ट्र शासन*

#NepalFlood #MaharashtraRescue #DevendraFadnavis #GirishMahajan #MAIMEDIA24 #वृत्तजे सत्य समोर आणते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here