Home मुंबई *“एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला” – नवजात कन्येचा पहिला प्रवास...

*“एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला” – नवजात कन्येचा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून!*

36
0

*“एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला” – नवजात कन्येचा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून!*

*मुंबई,
* पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहत उभी… तास झाला तरी रिक्षा नाही, हातात चिमुकली आणि घरी जाण्याची घाई.

याचवेळी रुग्णालयाचा पाहणी दौरा आटोपून बाहेर पडणाऱ्या *मुंबईच्या महापौर रितू तावडे* यांच्या कानी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज पडला. आईच्या डोळ्यातली काळजी पाहताच एक महिला म्हणून एका आईची वेदना त्यांनी क्षणात ओळखली.

*क्षणाचाही विलंब नाही…*
प्रसंग लक्षात येताच महापौर तावडे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्या बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या *महापौर वाहनात* बसवले आणि सुरक्षितपणे *खैरानी मार्ग, कुर्ला* येथे घरी पोहोचवले. वाहनात स्वतः नवजात कन्येला कुशीत घेऊन तिला आईकडे सोपवले आणि भरभरून आशीर्वाद दिले.

*पहिला प्रवास अविस्मरणीय*
जन्मानंतर रुग्णालयातून घरी जाणारा त्या चिमुकलीचा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला – हा क्षण त्या कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. “असा योग दुर्मीळच,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

महापौरांनी बाळाला प्रेमाने भेट देत स्वागत केले आणि आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले.

या कृतीतून *‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’* हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. मोठेपण पदात नसते, तर मनात असते – हे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कृतीतून सिद्ध केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here