Home पुणे *चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...

*चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश – ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवा*

6
0

*चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश – ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवा*

*पुणे, दि. २६:* चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री *सुनेत्रा अजित पवार* यांनी केले.

शासकीय विश्रामगृह पुणे येथे चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.

*सुनेत्रा पवार यांचे ५ मोठे निर्देश:*
१. *३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवा:* चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश – कामात दिरंगाई झाल्यास कारवाई
२. *१०० सुरक्षा कर्मचारी:* वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता तातडीने १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात – गरज पडल्यास नवीन पोलीस ठाणी
३. *अतिक्रमणांवर कारवाई:* येत्या शुक्रवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम – महिनाभरात पूर्ण करणार – कोणाचीही गय नाही
४. *कचरा व्यवस्थापन:* १९ गावे व MIDC क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार – प्लास्टिक कचऱ्यावर तातडीने उपाय
५. *पार्किंग व वाहतूक:* MIDC परिसरातील पार्किंग जागा एका आठवड्यात सुरू – रस्त्यावर उभे ट्रक पार्किंगमध्ये घेणार – गर्दीच्या वेळेत जड वाहनांना निर्बंध

दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here