Home मुंबई MMRDAचे स्पष्टीकरण संशय दूर करणारे नाही; उलट प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत...

MMRDAचे स्पष्टीकरण संशय दूर करणारे नाही; उलट प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत – धनंजय शिंदे.

27
0

 

MMRDAचे स्पष्टीकरण संशय दूर करणारे नाही; उलट प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत – धनंजय शिंदे.

मुंबई, दि. १८ ऑगस्ट..

MMRDAने प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात पुन्हा एकदा “TCS शासनमान्य आहे” आणि “Normalisation शासनमान्य पद्धतीने झाले” एवढेच सांगण्यात आले आहे. मात्र आमचा प्रश्न Normalisationच्या वैधतेचा नसून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकता व विश्वासार्हतेचा आहे. २००/२०० Normalised Marks कसे आले, याचे उत्तर केवळ Normalisation Formula सांगून मिळत नाही. Raw Marks, Shift-wise Mean/Standard Deviation, Normalisation Data, Response Sheets, Server Logs, CCTV Footage आणि इतर Technical Audit Records सार्वजनिक व स्वतंत्रपणे तपासले गेले पाहिजेत , असे काँग्रेस सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.

धनंजय शिंदे पुढे म्हणाले की, MMRDAने स्वतः मान्य केले आहे की Final Merit List अद्याप Verificationमध्ये आहे. मग स्वतंत्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच “कोणताही गैरप्रकार झालेला नाही” असा निष्कर्ष कसा काढला? ३४० objections निकाली काढणे म्हणजे परीक्षा प्रक्रियेतील संभाव्य गैरप्रकारांची चौकशी झाल्याचे प्रमाणपत्र नाही.आमची मागणी स्पष्ट आहे – सर्व संबंधित डेटा सुरक्षित ठेवावा, पारदर्शकपणे सार्वजनिक करावा आणि या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SITमार्फत चौकशी करावी.आम्हाला कोणत्याही निष्पाप उमेदवारावर अन्याय नको. पण दोषी कोणीही असेल तर त्याला संरक्षणही नको. ना दोषींना संरक्षण, ना प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय, डेटा सार्वजनिक करा. स्वतंत्र चौकशी करा. सत्य समोर आणा, असेही धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here