Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन*

*हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन*

40
0

*पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा रॅलीत सहभाग*

सोलापूर,

जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम व्यापक प्रमाणावर राबवली जात आहे. याच अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून एक्जीबिशन सेंटर पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. या रॅलीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सहभाग घेतला.
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत बाईक रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. ही बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यातून सात रस्ता, पोलीस लाईन रामवाडी येथून मरीआई चौकातील एक्जीबिशन सेंटर पर्यंत गेली. एक्जीबिशन सेंटर येथे बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
ही बाईक रॅली जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय व माय भारत यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here