Home मुंबई *महानगरपालिकांमध्ये आता स्वयंपुनर्विकासावर चर्चा घडतेय*

*महानगरपालिकांमध्ये आता स्वयंपुनर्विकासावर चर्चा घडतेय*

45
0

*महानगरपालिकांमध्ये आता स्वयंपुनर्विकासावर चर्चा घडतेय*

*योजनेसाठी दिलेला प्रत्येक क्षण सार्थकी लागल्याचे समाधान*

*स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन*

मुंबई – सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी मी मुंबई बँकेच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकास योजना मुंबई शहरात आणली. मुंबईत स्वयं पुनर्विकासामार्फत अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. आता महानगरपालिकांतही स्वयं पुनर्विकास योजनेवर चर्चा होतेय. नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी स्वयं पुनर्विकास योजनेला प्रोत्साहन देण्याचा आग्रह धरला आहे. एवढी वर्ष स्वयं पुनर्विकास योजनेसाठी दिलेला प्रत्येक क्षण सार्थकी लागल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

आ.दरेकर म्हणाले कि, नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात यूडीसीपीआर बाबत काल झालेल्या चर्चेची माहिती मी घेतली. नगरसेवकांनी स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्याचा आग्रह धरलेला आहे. परवडणारी घरे निर्माण व्हावीत आणि पायाभूत सुविधांवर ताण येणार नाही, असे धोरण नगर नियोजनात अवलंबावे, अशी शिफारस दरेकर अभ्यासगटाने शासनाला सादर केलेल्या अहवालातून केलेली आहे. हेही खरे आहे की, यूडीसीपीआरमधील अनेक तरतुदी स्वयं पुनर्विकासाला मारक आहेत. अशा प्रत्येक मारक तरतुदींबाबत आम्ही सविस्तर शिफारशी अहवालात केलेल्या असल्याचे दरेकरांनी म्हटले.

तसेच राज्याने गृहनिर्माण धोरण स्वीकारले. त्यातही स्वयं पुनर्विकास आणि समूह स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्याचे अधोरेखित केलेले आहे. पण गृहनिर्माण धोरण आणि डीसीपीआर/यूडीसीपीआरमध्ये काहीशा तफावती आहेत. त्या दूर करण्यासाठी स्वयं पुनर्विकास प्राधिकरण सातत्याने प्रयत्न करत आहे. प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, गटनेते, नगरसेवक आणि आयुक्त यांच्याशी येणाऱ्या काळात चर्चा करीन. ठोस पर्याय दरेकर अभ्यासगटाने सुचविलेला आहेच, पण आता शासन पातळीवरही याची पुन्हा एकदा चर्चा या निमित्ताने घडवून आणण्याची आवश्यकता आहे. तो प्रयत्न मी निश्चित करीन. नवी मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याचे काम प्राधिकरण करत असल्याचेही आ. दरेकरांनी सांगितले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here