Home मुंबई *जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेत अभिवादन*

*जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेत अभिवादन*

7
0

मुंबईचे आद्य शिल्पकार, जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामधील महापौर दालनातील जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेस उप महापौर श्री. संजय घाडी यांनी आज (दिनांक ३१ जुलै २०२६) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सहआयुक्त (सुधार) श्री. संजोग कबरे, महानगरपालिका सचिव श्री. मनोज कांबळे, अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर आणि श्री. चंद्रशेखर दाभोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here