Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट ‘मूर्ती’!*

*राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट ‘मूर्ती’!*

12
0

*राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट ‘मूर्ती’!*

कला जेव्हा समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करते, तेव्हा ती केवळ मनोरंजनाचे माध्यम राहत नाही, तर विचारप्रवर्तक ताकद बनते. अशाच आशयप्रधान आणि सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांची परंपरा पुढे नेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या आणि विचारप्रवर्तक मराठी चित्रपटासह येत आहे. ‘हलाल’ आणि ‘भोंगा’ सारख्या राष्ट्रीय पुरस्करांनी गौरविलेल्या चित्रपटांनंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षी निर्मितीतील ‘मूर्ती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समाजातील ज्वलंत प्रश्नांना संवेदनशीलपणे मांडत, प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवण्याची हातोटी दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी यापूर्वी सिद्ध केली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून सामाजिक भान, वास्तवाची जाणीव आणि विचारांना चालना देणारा आशय असतो. त्यामुळेच पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या शिवाजी लोटण पाटील यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष असते.

‘मूर्ती’ हा चित्रपटदेखील याला अपवाद नसून, एका वेगळ्या विषयाला प्रभावी सिनेमॅटिक मांडणी देत समाजाला अंतर्मुख करणारा अनुभव देणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती अमोल लक्ष्मण कागणे, लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि शिवाजी लोटण पाटील यांनी केली असून, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन शिवाजी लोटण पाटील यांचे आहे.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची जबाबदारी अनुभवी आणि कुशल तंत्रज्ञांच्या टीमने समर्थपणे सांभाळली आहे. मयुरेश जोशी यांनी छायांकन, हनी सातमकर यांनी संगीत, निलेश नवनाथ गावणे यांनी संकलन, तर रमेश इनामती यांनी ध्वनी संयोजनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन आकाश शिवाजी माळी, वेशभूषा माधव बाळुते, मेकअप नितीन दांडेकर आणि स्थिर छायाचित्रण (स्टिल फोटोग्राफी) नितीन भावसार यांनी केले आहे. महेंद्र माधुकर तिसगे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओ च्या अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांच्याकडे आहे.

‘मूर्ती’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी आणि ठळक ओळख निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here