Home मुंबई तुषार साळुंखे… नाशिक येथील उपसंचालक कार्यालयात मानधन तत्वावर (daily basis) नोकरी

तुषार साळुंखे… नाशिक येथील उपसंचालक कार्यालयात मानधन तत्वावर (daily basis) नोकरी

7
0

तुषार साळुंखे… नाशिक येथील उपसंचालक कार्यालयात मानधन तत्वावर (daily basis) नोकरी
मनीषा कदम (वित्त व लेखाधिकारी) जवळीक असलेला.. शरणपूर रोड तांत्रिक

शालार्थ आयडी विभाग नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय व शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या कडील प्रकरणे संबंधित शिक्षक/शिक्षण संस्था तथा संस्थाचालकांशी हातमिळवणी करून हे प्रकरण मंत्रालयात घेऊन जाऊन संबंधित कार्यसनाचे अधिकारी जसे की उप सचिव तुषार महाजन, कक्ष अधिकारी विशाल लोहार, कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, अवर सचिव प्रवीण मुंढे यांच्या कडे भेटून शासन स्तरावरून कार्यवाहीचे मान्यतेचे आदेश करून घेत. आणि असे मंत्रालय चे आदेश घेऊन उपसंचालक/ शिक्षण अधिकारी नाशिक यांच्या कडे येऊन संबंधित शालार्थ आयडी प्रक्रिया, शिक्षण नियुक्ती, इत्यादी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात असे.

अर्थात ह्या सर्व बनाव प्रक्रियेत तुषार साळुंखे सारखा एजंट हा एकमेव नसून यात असे अनेक एजंट सदरील कालावधीत स्थानिक पातळीपासून ते मंत्रालय पर्यंत मोठे रॅकेट सक्रिय होते.
ह्या रॅकेट मधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या लोकांचा समावेश उघडकीस आणण्यासाठी ह्या सर्व एजंट लोकांचे आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट, लोकेशन details,CDR तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच मंत्रालय सुरक्षा विभागात यांच्या नोंदी असतात जसे की, प्रवेश पास, CCTV footage, सध्यस्थितीत नव्याने सुरू झालेली डिजिटल प्रवेश प्रक्रिया, मागील दोन तीन वर्षा पासून मंत्रालय परिसरातील cctv ची तपासणी, आमदार निवास परिसरातील CCTV footage, इत्यादी बाबी अत्यंत बारकाईने तपासल्या पाहिजे.

बोगस शिक्षक बोगस शालार्थ आयडी प्रक्रियेत सहभाग असेल अधिकाऱ्यांचे त्यांचे प्रॉपर्टीचे मालमत्ता दायित्व तपासणी करण्यात यावी. मिळकतीच्या पेक्षा जास्तीची संपत्ती इत्यादी बाकी भ्रष्ट मार्गाने आणि ह्या प्रकरणात सामील असल्याचे स्पष्टीकरण असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here