Home मुंबई *एनसीयूआयच्या संचालकपदी बिनविरोध निवड* *झाल्याबद्दल आ. प्रवीण दरेकरांचा शुक्रवारी सत्कार*

*एनसीयूआयच्या संचालकपदी बिनविरोध निवड* *झाल्याबद्दल आ. प्रवीण दरेकरांचा शुक्रवारी सत्कार*

6
0

मुंबई- बृहन्मुंबई मजूर चळवळीच्या वतीने भारतीय सहकारी संघ, नवी दिल्ली (एनसीयूआय) या शिखर सहकारी संस्थेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे व मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दादर (पूर्व) येथील स्वामी नारायण मंदिराच्या समोरील कोहिनुर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक प्रकाश दरेकर, विनोद बोरसे, आनंदराव गोळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व मुंबई-कोकण विभागीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष सुनिल बांबूळकर, उपाध्यक्ष अरुण शंकर, पूर्व उपनगरे जिल्हा मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंखे, पश्चिम उपनगरे जिल्हा मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष शशिकांत पाद्धे यांनी दिली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here