*विषय:* बेस्ट संयुक्त कृती समिती आणि बेस्ट प्रशासन यांच्यात झालेली सकारात्मक बैठक
बेस्ट संयुक्त कृती समितीने काही दिवसांपूर्वी केलेल्या संपाच्या अनुषंगाने *महाराष्ट्र राज्याचे उपसभापती विधान परिषद श्री. सचिन भाऊ अहिर यांच्या मध्यस्थीने*
*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब* यांनी पुढील मागण्यांसंदर्भात आश्वासन दिले होते:
1. बेस्टचा पुढील करार
2. निवृत्त कर्मचारी वर्गाची थकीत देणी
3. बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस
4. नवीन कामगार भरती
5. इतर प्रलंबित मागण्या
त्या अनुषंगाने *राज्याचे प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग श्री. असीम गुप्ता (IAS)* आणि *मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे (IAS)* यांनी यामध्ये लक्ष घालून बेस्टचे महाव्यवस्थापक आणि बेस्ट प्रशासनाला *बेस्ट संयुक्त कृती समिती* सोबत चर्चा करून पुढील १५ दिवसात अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
*आज दि. २७/०७/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता* बेस्ट संयुक्त कृती समिती आणि बेस्ट प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांची या सर्व मुद्द्यांवर *प्रथम सकारात्मक बैठक* पार पडली.
या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. पुढील बैठक *शनिवार, दि. ०१/०८/२०२६* रोजी घेण्यात येणार आहे.
ॲड. उदय आबोणकर
कृती समिती निमंत्रक



















