Home मुंबई मुंबई काँग्रेसच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची स्थापन..

मुंबई काँग्रेसच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची स्थापन..

30
0

मुंबई, दि. ८ जुलै..

मुंबईत मागील सहा दिवसात मुसळधार पावसाने मोठी हानी झाली असून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. महापालिका व्यवस्थापन कुठेच दिसत नाही अशी परिस्थिती असून, या संकटाच्या काळात महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात उद्धभवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची स्थापन केली आहे. मान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदतीसाठी ही समिती काम करेल.

शहरातील पाणी साचलेले भाग, झाडे पडण्याच्या घटना, बाधित नागरिकांचे स्थलांतर, निवारा व्यवस्था तसेच सुरू असलेल्या मदत व पुनर्स्थापना कामांचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि कार्यवाही करण्यासाठी समन्वय करणे, मदत मिळवून देणे, मदत करणे, मान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदतीसाठी काम करेल.

मुंबई काँग्रेसच्या आपत्ती व्यवस्थापन पथकात खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, अस्लम शेख, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल आ. डॉ. ज्योती गायकवाड, बीएमसीतील गटनेते अश्रफ आझमी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.

नोट- सोबत आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांची यादी जोडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here