चहासोबत खाण्याचं बिस्किट म्हणजे मैदा, साखर, डालडा आलंच. पण कोकण दापोलीच्या पुर्वा कामेरकर यांनी अपुर्वाज होम मेड बिस्किटस’ या ब्रँडमधून हा समज मोडून काढला. त्या देशी गूळ आणि देशी तुपातली मिलेट बिस्किट बनवतात. त्यात मैदा, साखर, प्रिझर्वेटिव्ह, इसेन्स, डालडा, अमोनिया पावडर किंवा गव्हाचं पीठही वापरत नाहीत. त्यामुळे ‘अपुर्वाज होम मेड बिस्किटस’ हे हेल्दी आणि पोषण तत्त्वाने परिपुर्ण आहे असं म्हणता येईल.
*यांंचं वेगळेपण काय?*
कोकणच्या फणसाचे बिस्किट!
‘अपुर्वाज होम मेड बिस्किटस’चं सर्वात मोठं वेगळेपण म्हणजे फळांचा रस किंवा पल्प वापरून केलेली बिस्किट! केळी बिस्किट,जांभूळ बिस्किट आणि सगळ्यात हटके म्हणजे फणस बिस्किट. कोकणात, विशेषतः दापोलीत भरपूर मिळणाऱ्या फणसाचा वापर करून त्यांनी बाजारात सहसा न मिळणारं उत्पादन तयार केलं आहे. कोकणच्या मातीचा गंधच त्यांच्या बिस्किटात आहे.
*गेली ४ वर्षे, रोज ४०-५० किलो उत्पादन*
दापोलीच्या पुर्वाताई गेली ४ वर्षे हा व्यवसाय करत आहेत. ‘अपुर्वाज होम मेड बिस्किटस’ची बाजारातील मागणी बघता दिवसाला सहज ४० ते ५० किलो बिस्किट* तयार होतं. मिलेट, गूळ, तूप आणि फळांचा पल्प यांच्या कॉम्बिनेशनमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे बिस्किट आरोग्यदायी ठरत आहेत.
*’उमेद’ आणि ‘सरस’ मुळे मिळाली ओळख*
पुर्वाताई सांगतात की, “आमच्या ‘अपुर्वाज होम मेड बिस्किटस’च्या व्यवसायात ‘उमेद’ आणि ‘सरस’ चा खूप फायदा झाला. उमेदमुळे वेगवेगळ्या शहरात जाऊन उत्पादन विकता आलं. त्यामुळे अनेक शहरांतील लोकांना आमच्या प्रोडक्टची माहिती मिळाली. तिथून येणाऱ्या ऑर्डर्स आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे आर्थिक बाजू स्ट्रॉंग होत आहे. उमेदने दिलेल्या या प्लॅटफॉर्मसाठी मी कायम आभारी राहीन.”*
*वाढीसाठी योजना: डीलर नेटवर्क आणि सोशल मीडिया*
आपल्या होम मेड बिस्किटस’च्या वाढीसाठी पुर्वाताई ज्या-ज्या शहरात जातात तिथे *डीलर किंवा शॉपशी टाय-अप* करण्यावर भर देत आहेत. सोबतच *सोशल मीडियाचा* वापर करून व्यवसायाचा प्रसार करत आहेत. इतरही सरकारी योजनांचा लाभ भविष्यात घेण्याचा विचार आहे.
या कामात इतर महिलांनाही रोजगार मिळतो आहे. त्यांच्या गावांसह आजुबाजुच्या गावातील महिलाही यात वेळ प्रसंगी सहभागी होतात.
मैदा-साखरेला फाटा देऊन देशी गूळ, तूप आणि मिलेटमधून आरोग्य देणारा ‘अपुर्वाज होम मेड बिस्किटस’ हा ब्रँड कोकण दापोलीच्या पुर्वाताईंनी उभा केला आहे. हा प्रवास अनेक महिला उद्योजकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
—




















