Home मुंबई ‘शेवग्याच्या शेंगा’तून भरारी घेणाऱ्या उद्योजिका मंजुषा देशमुख

‘शेवग्याच्या शेंगा’तून भरारी घेणाऱ्या उद्योजिका मंजुषा देशमुख

29
0

*’ती’च्या भरारीचे आभाळ तिने कमावलेले स्थान शब्दांकित करण्याचा, तिला आरसा दाखवताना समाजातील स्त्रीशक्तीला प्रेरणा देण्याचा आमचा हा प्रयत्न –

स्त्रीशक्ती मनात आणलं तर काय करू शकते? याचं जिवंत उदाहरण म्हणजे नांदेडच्या तावडेवाडी बुद्रुक येथील मंजुषा देशमुख.बि.इ. आय.टी. झाल्यावर पुणे-हैदराबादला आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या मंजुषा देशमुख यांनी ‘शेवग्याच्या शेंग’त आपलं भविष्य पाहिलं आणि आज त्या ‘मोरिंगो’च्या ३० लाखांच्या उलाढालीच्या उद्योजिका आहेत.

नवी मुंबईत सिडको येथे भरलेल्या *’सरस महालक्ष्मी २०२६’* प्रदर्शनात ‘समृद्धी स्वयंसहायता समूहा’च्या स्टॉलवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती मिळाली.
आयटी चा जॉब सोडून शेवगा उद्योग का? या प्रश्नावर मंजुषा म्हणाल्या की, “हैदराबादला नोकरी करताना ‘मोरिंगो’चं महत्त्व कळलं. जग त्याला ‘सुपरफूड’ म्हणतं. आयर्न, कॅल्शियमचा खजिना यात आहे. इम्युनिटी बूस्टर आणि ३०० आजारांवर रामबाण मोरिंगो आहे, मंजुषा देशमुख सांगतात.
*मग काय, नोकरी सोडली. गावी आल्या. १० एकरात सेंद्रिय पद्धतीने शेवग्याची लागवड केली. स्वतःच्या शेतातच ऑरगॅनिक खत तयार केलं.*
*१० एकरातून ३० लाखांचा व्यवसाय कसा?*
तर “वर्षाला ३० टन शेवग्याचा पाला निघतो. त्यापासून आम्ही ‘मोरिंगो पावडर’ बनवतो. ही पावडर बल्कमध्ये विकली जाते. भारतात आणि परदेशातही याला मोठी मागणी आहे,” असं त्या अभिमानाने सांगतात.
मोरिंगो पावडर, टॅबलेट, ५ प्रकारचे साबण. “साबण त्वचेसाठी, अँटी-फंगल, अँटी-इन्फेक्शनसाठी उत्तम आहेत.”

● ‘एकटी’ नाही, ‘सगळ्यांना’ घेऊन प्रगती*
“आमच्या बचतगटात १० महिला आहेत. त्यांना कायम रोजगार आहे. मोठी ऑर्डर आली की शेजारच्या गावातून १०-१५ महिलांना बोलावतो. माझे पती, सासूबाईंचा यासाठी पुर्ण पाठिंबा आहे. शेतीपासून पॅकिंगपर्यंत सगळे सोबत आहेत,” मंजुषा देशमुख कृतज्ञतेने सांगतात.
*त्यांच्या कर्तृत्वाच्या दर्पणात पती, सासू आणि बचतगटातील सहकारी यांचा सहभाग ठळकपणे दिसतो.*

● ‘उमेद’ने दिले बळ*
“फूड लायसन्स, अन्न-औषध प्रमाणपत्र, एक्सपोर्टसाठी NPOP सर्टिफिकेट… हे सगळं किचकट वाटतं. पण ‘उमेद’ अभियान सतत मार्गदर्शन करतं. प्रशिक्षण, लेबलिंग, पॅकेजिंग… सगळ्यात मदत होते,” असंंही त्या सांगतात.
*’सरस महालक्ष्मी’ प्रदर्शनाबद्दल त्या म्हणतात, “प्रथमच स्टॉल लावला पण इथे नियोजन इतकं छान आहे की घरापासून लांब आहोत असं वाटलंच नाही. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उमेदने हा खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलाय.”*
● दर्पणात दिसलंय की,
*B.E. IT झालेल्या मंजुषा देशमुख नोकरी सोडून शेतात राबतात. शेवग्याच्या पाल्यापासून उत्पादने तयार करतात. १० महिलांना रोजगार देतात. ३० लाखांची उलाढाल करतात.ही गोष्ट फक्त ‘उद्योग’ नाही, ‘उद्यम + कुटुंब + समाज’ यांचा त्रिवेणी संगम आहे.
मंजुषा देशमुख सांगतात, “स्त्रीशक्ती मनात आणलं तर खूप काही करू शकते. फक्त संधी आणि दिशा हवी. आज “‘ग्लोबल स्त्रीदर्पण’मधून दिसणाऱ्या या मंजुषा देशमुख आज हजारो स्त्रियांसाठी दिशा बनल्या आहेत.*
संवाद : *शीतल हरीष करदेकर*
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here