मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ चे सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी मुंबईहून पंढरपूरकडे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले.
प्रथेप्रमाणे, दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांनी सायंकाळच्या विश्रांतीसाठी दादर येथील चर्मोद्योग कामगार सेनेच्या कार्यालयाला भेट दिली.
यावेळी चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष श्री. मयुर चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते वारकरी बांधवांना अल्पोहर व वारीदरम्यान आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू तसेच रेनकोट, छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे वारकरी बांधवांना मोलाचे सहकार्य लाभले असून, सेवा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थित वारकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.
याप्रसंगी श्री. मयुर कांबळे, रेखा कांबळे, भास्कर गद्रे, भटू अहिरे, रमेश धाकराव, हेमंत झिंजुर्डे, विनोद सातपुते, बाबूभाई, ह. भ. प. नारायण महाराज पाटील, ह. भ. प. चंद्रकांत महाराज कारंडे यांच्यासह शेकडो वारकरी बांधव उपस्थित होते.



















