Home मुंबई *राज्यात सहकार विद्यापीठासंदर्भात शासन निर्णय करावा* *पुरवणी मागणीवर बोलताना आ. प्रवीण...

*राज्यात सहकार विद्यापीठासंदर्भात शासन निर्णय करावा* *पुरवणी मागणीवर बोलताना आ. प्रवीण दरेकरांची विनंती*

32
0

मुंबई – गुजरातला त्रिभुवन विद्यापीठ आहे. महाराष्ट्र सहकार विद्यापीठ असावे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. राज्यात अडीच लाख सहकारी संस्था आहेत. त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण देणारा राज्य सहकारी संघ आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची इमारत, प्रशिक्षण देणारी यंत्रणा आहे. १३ विभागीय केंद्रे आहेत. त्यामुळे शासनाने सहकार विद्यापीठ करण्यासंदर्भात शासन निर्णय करावा, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सभागृहात पुरवणी मागणीवर बोलताना केली.

पुरवणी मागणीवर बोलताना आ. दरेकर म्हणाले की, माहिती भवनासाठी १ कोटी ५५ लाख ४ हजार रुपयांची मागणी सभागृहासमोर ठेवण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने प्रयत्न केले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता मराठी प्रचारासाठी केंद्राकडून निधी मिळणार आहे. राज्य सरकार पूर्वीपासून मराठीच्या संवर्धन व प्रसारासाठी काम करतेय. पण आता त्यांना केंद्राचीही साथ मिळणार आहे. प्राचीन ग्रंथांचे जतन करणे, भाषांतर करणे, विद्यापीठात विशेष केंद्र स्थापन करणे, संशोधनाचे उपक्रम ही कामे केंद्राच्या मदतीने झपाट्याने होण्याची गरज आहे. ५ वर्षाचा कार्यक्रम तयार करून काम व्हावे व आवश्यकता असल्यास तज्ञांची समिती नेमावी.

तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला पूर्वी शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण निधी चालू होता. आता शिक्षण निधी बंद झाला आहे. राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी सुरू करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असून या करिता तोष्णीवाल समितीनेही शिफारस केली आहे. संघाचे अनुदान देणेही शिल्लक असून तेही द्यावे. स्वयंपुनर्विकास ही योजना हाउसिंगमध्ये आणली. आज ही योजना मोठ्या प्रमाणावर हाऊसिंगमध्ये सुरू आहे. जवळपास १६०० प्रस्ताव आलेत. ४६ सोसायट्यांना कर्ज देऊन २१ इमारती उभ्या राहिल्या आहेत. विकासक देतो त्यापेक्षा दुप्पट व तिप्पट जागा रहिवाशांना मिळत असल्याने पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. स्वयंपुनर्विकासाठी शासनाने २५ हजार कोटी उपलब्ध करावे, अशी विनंतीही दरेकरांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना केली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here