Home मुंबई *‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना चालकांच्या हितासाठी, कोणताही स्वार्थ नाही*

*‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना चालकांच्या हितासाठी, कोणताही स्वार्थ नाही*

37
0

*माघार घ्या बोलल्यास घेईन! चालकांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?*

*भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचा सवाल*

मुंबई – राज्यात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या देवाभाऊ सहकार टॅक्सी योजनेबाबत सुरु असलेल्या आरोपांवरून भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या उपक्रमाला ‘नमो सहकारी टॅक्सी’ हे नाव देणार असून ‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना ही चालकांच्या हितासाठी आहे. यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. माघार घेण्यास बोलले तर घेईन, मात्र खासगी कंपन्यांमुळे चालकांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?, असा खडा सवालही यावेळी दरेकरांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत देवदत्त सहकारी संस्थेची वस्तुस्थिती मांडताना दरेकर म्हणाले की, देवदत्त सहकारी संस्था ही वाहतूक व पर्यटन क्षेत्रात काम करण्यासाठी स्थापन झाली होती. या संस्थेची रीतर नोंदणी झाली असून त्याचे प्रमाणपत्रही आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना वाहतूक व पर्यटन क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ देणे हा प्रमुख उद्देश आहे. परंतु काही कारणास्तव ही संस्था मृतावस्थेत होती. हे समजल्यानंतर ती संस्था पुनर्जीवित करण्याचा मी प्रयत्न केला. या संस्थेच्या माध्यमातून टॅक्सी सेवा हा उपक्रम वाहतूकशी संबंधित असल्याने सुरू करण्याचा विचार केला. हा उपक्रम झाला तर पहिल्या टप्प्यात ३ हजार टॅक्सी रस्त्यावर आणल्या तर प्रत्येकी २ हजार विशेषतः मराठी तरुण व ५० टक्के महिला चालकांना रोजगार मिळणार आहे. ओला, उबर, रॅपिडो या खाजगी कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून चालकांचे रक्त शोषले जाते. देवाभाऊ टॅक्सी नावावर कुणाचा आक्षेप असेल तर तेही बदलू. उलट मुख्यमंत्री यांनी नमो टॅक्सी हे नाव सुचवले आहे. यामुळे ज्या चालकांना यात सहभागी करणार आहोत ते स्वतः भागीदार बनणार आहेत. संस्थेचे ते शेअर होल्डर बनणार आहेत. जो नफा कमवला जाईल त्याचे शेअरिंग चालकांना जाणार आहे. कुठल्याही बँकेचे कर्ज घेणे हे धोरण असते. मुंबई बँकेत गाडी घेण्यासाठी कर्ज देण्याची पॉलिसी अनेक वर्ष आहे. आता फक्त त्या संस्थेच्या माध्यमातून जावे कारण संस्थेला रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो, असा स्पष्ट उद्देश आहे. तसेच देवदत्त सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली असून त्याचे पुरावेही माझ्याकडे असल्याचे सांगत दरेकरांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढली.

*आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने*

*सहकारातील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान*

यावेळी आ. दरेकर म्हणाले की, ४ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सहकार चळवळीसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, संस्थांचा सन्मान पुरस्काराने होणार आहे. त्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार राज्यमंत्री, राज्याचे सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, उद्योगमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीने अशा प्रकारचा हा कार्यक्रम यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here