Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *ही सुरुवात आहे*… *‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी...

*ही सुरुवात आहे*… *‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ५० कोटींची भव्य गुंतवणूक*

48
0

मराठी चित्रपटसृष्टीत ‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ची संकल्पना ‘घबाडकुंड’ चित्रपटाद्वारे यशस्वीपणे साकारत नवा इतिहास रचणाऱ्या आयकॉन डी स्टाईल एंटरटेन्मेंट अँड लाइफस्टाईल प्रा. लि.ने आता मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायाची अधिकृत तयारी सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनी तब्बल ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा निर्माते डॉ. रसिक कदम यांनी केली.

मराठी सिनेमात एक वेगळे आणि व्यापक सिनेमॅटिक विश्व निर्माण करणाऱ्या ‘घबाडकुंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत फ्रँचायझी-आधारित कथानकांना नवे दालन खुले झाले आहे. याच यशाच्या बळावर आता मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय अधिक भव्य, तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचा सिने-अनुभव घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याविषयी बोलताना डॉ. रसिक कदम म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीला केवळ स्वतंत्र यशस्वी चित्रपटांची नव्हे, तर दीर्घकालीन सिनेमॅटिक फ्रँचायझीची आवश्यकता आहे. ‘घबाडकुंड’ हा त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे टाकलेला पहिला महत्त्वाचा टप्पा होता. आता दुसऱ्या अध्यायासाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून आम्ही मराठी सिनेमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत.”

या नव्या प्रकल्पाचे कथानक, कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मितीशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक, रोमांचकारी आणि उच्च दर्जाच्या दृश्य अनुभवाची मेजवानी मिळणार असून, मराठी सिनेमासाठी हे एक नवे आणि ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेण्याच्या ध्येयाने साकार होणारा हा प्रकल्प आगामी काळात उद्योगक्षेत्र आणि प्रेक्षक या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here