*उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!*
*खासदार ओमराजे निंबाळकरांचा शिंदे सोबत जाणार
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभव, विकासकामांसाठी सत्तेची गरज आणि पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात न्याय मिळण्याच्या अपेक्षेमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. सीबीआय उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


















