Home मुंबई *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत रोजगार योजनेत योगदान देऊया*

*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत रोजगार योजनेत योगदान देऊया*

41
0

*ईपीएफओतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन*

मुंबई – प्रधानमंत्री विकसित भारत योजना ही भारताच्या उज्वल भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत रोजगार योजनेत योगदान देऊया, सर्वांनी मिळून रोजगार निर्मितीचा कार्यक्रम यशस्वी करूया असे प्रतिपादन भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी ईपीएफओतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटना प्रोत्साहन वितरण समारंभ आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमादरम्यान पात्र लाभार्थ्यांना सुमारे २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे मुंबई बँकेच्या मुख्य कार्यालयात मोठीस्क्रिन लावून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर बोलत होते. याप्रसंगी ईपीएफओचे अमित जैन, राजू मुखर्जी, मुंबई जिल्हा बँकेचे संचालक, विठ्ठलराव भोसले, नितीन बनकर, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, आपला देश जगात सर्वात युवा देश आहे. जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षाखालील आहे. या युवाशक्तीला कौशल्य विकास, रोजगार देणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ रोजगार देण्यापूर्तीच नाही तर रोजगार निर्मिती ही कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा व अर्थव्यवस्थेत युवकांचा सहभाग असा व्यापक विचार या योजनेच्या मागे आहे. या योजनेतून पहिली नोकरी मिळवणाऱ्या युवकाला आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. नवीन रोजगार निर्माण करणारे उद्योग, आत्ता नाही प्रोत्साहन दिले जाते. देशातील लाखो युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पंतप्रधान मोदींचा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. ही योजना विकसित भारत २०४७ या ध्येयाशी जोडलेली आहे. विकसित भारत म्हणजे केवळ मोठी अर्थव्यवस्था नाही तर प्रत्येक युवकाला संधी, प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य आणि प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळवून देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय आहे. गेल्या बारा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगार, स्टार्टअप स्किल इंडिया, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मुद्रा योजना आदी उपक्रमांच्या युवकांना सक्षम करण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री विकसित भारत योजना हे त्याचे पुढचे पाऊल आहे. या योजनेमुळे लाखो युवकांना रोजगार, उद्योग धंद्यांना बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे सामाजिक सुरक्षाही राखली जाणार आहे आणि भारताचा विकसित राष्ट्र बनविण्याचा जो प्रवास आहे त्यालाही गती मिळणार असल्याचेही दरेकर म्हणाले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here